News Cover Image

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश
पेठ, ता. ८ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री जाधव पी. आर. साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी श्रीमती कुवर डी वाय मॅडम व मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम सर होते. यात वक्तृत्त्व स्पर्धेसाठी  तालुक्यातील ११ शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते तर विज्ञान नाटीकेसाठी तीन शाळांनी आपला सहभाग नोंदवला. यात दोन्ही स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात
वक्तृत्त्व स्पर्धेत श्री देवेंद्र ज्ञानेश्वर सोनवणे इ. ९ वी हा विद्यार्थी प्रथम आला. तर 'दिखावे की दुनिया' या विज्ञान नाटीकेत विद्यालयातील इ.१० वी च्या विद्यार्थिनींचा चमुने प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री केला डी जी., श्री केदार सी डी, श्रीमती गरुड एस के, श्रीमती पवार एस सी यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.