Facilities
शाळेची रचना आणि सुविधा -
गिरजादेवी आश्रमशाळा ही अनुदानित आश्रमशाळांच्या धर्तीवर बांधली गेली आहे. या शाळेत खालील सुविधा उपलब्ध आहेत :-
१. निवास व्यवस्था :- शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत, जिथे ते राहू शकतात. ही सुविधा
विशेषतः दूरच्या गावांमधून येणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
२. भोजन :- विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो, ज्यामध्ये धान्य, डाळी, पाले भाज्या, फळ भाज्या आणि
काही वेळा दूध, अंडी, चिकन तसेच मटन यांचा समावेश असतो. यामुळे त्यांची शारीरिक वाढ
आणि आरोग्य राखले जाते.
३. शैक्षणिक साहित्य :- पुस्तके, वह्या, पेन, पाटी, दफ्तर, लोखंडी पेटी, शालेय गणवेश आणि इतर शैक्षणिक
साहित्य संस्थेकडून शासकीय नियमानुसार पुरेशा प्रमाणात पुरवले जाते.
४. वर्गखोल्या :- इ. १ ली ते इ. १२ वी साठी शाळेत पुरेशा व हवेशीर वर्गखोल्या असून त्या बोलक्या
आहेत. विद्यार्थी स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य तयार करून सजावट करण्यात
आलेल्या आहेत व त्यामध्ये नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो.
५. क्रीडांगण :- शारीरिक शिक्षण आणि खेळांसाठी क्रीडांगणाची सोय आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास होतो. या क्रीडांगणात व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो अशा विविध
खेळांची मैदाने आहेत.
६. प्रयोगशाळा :- शाळेमध्ये सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आहे. जेथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थी विज्ञान विषयाचे प्रयोग करतात.
७. अटल टिंकरिंग लॅब :- शाळेमध्ये केंद्र पुरस्कृत अटल टिंकरिंग लॅब आहे. जेथे शिक्षकांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विविध वैज्ञानिक प्रतिकृतींची
निर्मिती करतात.
८. कौशल्य विकास अभ्यासक्रम :- शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा या
उद्देश्याने संस्थेतर्फे शाळेने कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. या
अभ्यासक्रमात संगणक प्रशिक्षण, बेसिक इलेक्ट्रिकल, मोबाईल रिपेरिंग, फॅशन
डीझाइन असे विविध विषय शिकविले जातात.
९. इ - लर्निंग :- शालेय अभ्यासक्रम शिकवितांना आधुनिक पद्धतींचा अवलंब केला जातो.
त्यामध्ये प्रोजेक्टर व LED TV द्वारे इ - लर्निंग चा वापर करून शिक्षण दिले
जाते.
१०. शिक्षक :- सर्व वर्गांसाठी प्रशिक्षित शिक्षकांचा कर्मचारी वर्ग शाळेत कार्यरत आहे, जे
आधुनिक पद्धतींचा अवलंब करून शिक्षण देतात.