News Cover Image

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पालक मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात व अानंदात संपन्न झाला.  यावेळी पालकांची उपस्थित समाधानकारक होती. शाळेच्या कामकाजाविषयी व उपक्रमांविषयी पालकांनी समाधान व्यक्त केले. या पालक -शिक्षक सहविचार सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री महेश आनंदा रहाणे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री दीपक बाबुभाई भगत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पाटील सरांनी सभेचा उद्देश व विद्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयात राबवीत असलेले उपक्रम व समिती याबद्दल पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व आपल्या शंखा विचारल्या. श्री महेश रहाणे यांनीही आपल्या भाषणातून शाळेची स्तुती केली.  शेवटी पाटील सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन  पालकांना समाधानकारक उत्तरे दिली.  यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. पर्यवेक्षक श्री मोरे एम एस., श्री आहेर डी टी  सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित होते. या कार्यक्रामाच्या यशस्वीतेसाठी श्री खुरकुटे जी एन, श्री जाधव ए वाय, श्री सोनवणे डी एन, श्री तलवारे व्ही डी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.