News Cover Image

नाशिक रन यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर येथे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट सातपूर नाशिक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मुलींच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक चे पदाधिकारी श्री. कासार साहेब, श्री. दैठणकर साहेब, श्री. देशमुख साहेब त्याचप्रमाणे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय  हेमलताताई बिडकर, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.