News Cover Image

रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन तर्फे आश्रमशाळा शिंदे दि. येथे विविध साहित्याचे वाटप

रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन तर्फे आश्रमशाळा शिंदे दि. शाळेस ३ संगणक संच व फॅशन डिझाईन कोर्स साठी विविध साहित्य भेट दिलीत याचा वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

 या वेळी संस्थेच्या अध्यक्षा आद. ताईसाहेब, रोटरी क्लब नाशिक मिड टाऊन चे अध्यक्ष मा. श्री. अॅड. अजय जाधव साहेब, श्री. दिपक ढोलकिया साहेब, माजी अध्यक्ष श्री. दिलीप काळे साहेब उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी स्किल डेव्लपमेंट कोर्सेसची माहिती घेतली. सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा आद.ताईसाहेब यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सामाजिक क्षेत्रातील जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.