News Cover Image

शाळा प्रवेशोस्तव

दि.१५ जून २०२४ - गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे दि. ता.सुरगाणा येथे शैक्षणिक वर्ष सन-२०२४-२५ शाळेच्या पहिली दिवशी शाळा प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालय येथून श्री.पवार (क. लिपिक) हे उपस्थित होते. इ १ ली च्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना लोखंडी पेटी,पाटी, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य व इतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.