स्व. डॉ. विजय बिडकरजी (बाबा) यांची जयंती साजरी
दि. ०१ एप्रिल २०२५ - गिरजादेवी प्राथ. माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा शिंदे दिगर, ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव, आदिवासींचे नि:स्पृह आरोग्य सेवक तथा आरोग्यदूत, निर्मला पुरस्काराने सन्मानित, वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी व आदिवासी भागात भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व स्व.डॉ.विजयजी बिडकर (बाबा) यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या दोन्ही मुख्याध्यापक यांनी स्व.डॉ.विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विवेक राठोड सर व प्राथमिक मुख्याध्यापक अनिल सोनवणे यांनी आपल्या मनोगतात स्व. डॉ.विजयजी बिडकर यांच्या आठवणी व जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सर्व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.